अल्टीमस कोअर बँकिंग सोल्युशन

  • क्लाउड वर आधारित सोल्युशन

  • वाढवा आपला व्यवसाय

  • समाधानी ग्राहक

अल्टिमस - कोअर बँकिंग सोल्युशन

एकीकडे वारंवार विकसित होत असलेल्या शासकीय / वैधानिक नियंत्रण प्रणाली मुळे सहकारी पतसंस्था, बहु-राज्य पतसंस्था आणि निधी कंपन्यांना अधिक कठोर निकषांचे पालन करणे जरुरीचे झाले आहे तर दुसरीकडे, ग्राहक वित्तीय संस्थांकडून अधिक चांगल्या सेवेची अपेक्षा करीत आहेत. पारंपारिक ऑफ लाईन सोल्युशन या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत.

अल्टिमस कोअरबँकिंग सोल्युशन सहकारी पत संस्था, मल्टी-स्टेट पतसंस्था आणि निधी कंपन्यांना, तीव्र स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर व्यासपीठ उपलब्ध करुन देते.

महत्वाची वैशिष्टे

  • पूर्णपणे ऑनलाईन कोअर बँकिंग प्रणाली जी वाजवी किमतीत उपलब्ध आहे. वापर-तसा-खर्च तत्वावर आधारित.
  • बँकेसारखी सुरक्षा असलेली सॉफ्टवेअर प्रणाली.
  • प्रणालीचा कुठूनही तसेच दिवसरात्र वापर शक्य. आपल्या व्यवसायावर स्थान अथवा कालाचे बंधन कशासाठी?
  • रिअल टाइम रिपोर्टिंग. कार्यक्षम आंतर शाखा मेळ. स्वयंचलित शाखा माहिती एकत्रीकरण. ग्राहकांसाठी मोबाईल अँप.

सामान्य प्रश्नोत्तरे

अल्टिमस कोअर बँकिंग सोल्युशन विशेषतः सहकारी पत संस्था, मल्टी-स्टेट सहकारी पत संस्था आणि निधी कंपन्यांसाठी विकसित केले गेले आहे. हा क्लाऊड बेस्ड इंटिग्रेटेड अप्लिकेशन संच आहे जो आपल्या व्यवसायाचे सहजपणे व्यवस्थापन करण्यात मदत करतो.
अल्टिमस कोअर बँकिंग ऑन-लाइन आणि क्लाउड बेस्ड सोल्युशन असल्याने आमच्या ग्राहकांना त्यांच्या स्वत: च्या सर्व्हरमध्ये आणि महागड्या सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज नाही. आम्ही सॉफ्टवेअर-ही-एक-सेवा म्हणून देण्याचे मॉडेल ऑफर करत आहोत आणि यामुळे ते अतिशय कमी खर्चामध्ये उपलब्ध केले गेले आहे.
अल्टिमस कोअर बँकिंग सोल्युशन अत्यंत सुरक्षित आहे. सुरक्षित लॉगिन, डेटा एन्क्रिप्शन, भूमिकांवर आधारित वापरकर्त्याच्या सुरक्षेचे अनेक स्तर इत्यादी सोयी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त सुरक्षित व्यवहारांसाठी आणि हॅकिंग पासून संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक फायरवॉल आणि आयपी फिल्टरिंग सिस्टिम चाही वापर केला गेला आहे.
नाही. आमची तांत्रिक टीम आपल्या सध्याच्या सॉफ्टवेअर प्रणालीची तपासणी करेल आणि नवीन सिस्टिम मध्ये आपला जुना डेटा स्थानांतरित करण्याचा सर्वोत्तम संभाव्य मार्ग सुचवेल.
अल्टिमस कोअरबँकिंग सोल्युशन क्लाऊड बेस्ड असून मानवनिर्मित किंवा भूकंप, आग, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीतही आपल्याला सर्वोच्च अपटाइम देण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. जर अशी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवलीच तर कमीतकमी कालावधीत आपला व्यवसाय पूर्वपदावर आणण्याची हमी आम्ही देतो. हे साध्य करण्यासाठी आम्ही एकाहून अधिक ठिकाणी जागतिक दर्जाच्या डेटा सेन्टर्स मध्ये सर्व्हर्स होस्ट केलेले आहेत.
अल्टिमस कोअर बँकिंग सोल्युशन एक इंटिग्रेटेड अप्लिकेशन सूट आहे. यात सदस्यता, ठेवी, कर्जे, गुंतवणूक आणि आर्थिक लेखा यासारख्या मोड्यूल्सचा समावेश आहे. तसेच या व्यतिरिक्त कस्टमर रिलेशनशिप मॅनॅजमेण्ट, मोबाईल अँप्स इत्यादींचा समावेश आहे.

अल्टिमस कोअरबँकिंग सोल्युशन खालील फायदे देते

  • कर्मचार्यांची वाढीव उत्पादकता
  • कुठल्याही ठिकाणाहून, दिवस / रात्र वापर
  • ऑपरेटिंग खर्चात बचत
  • सर्व शाखा आणि मुख्य कार्यालयासाठी स्वयंचलित एकत्रीकरण
  • स्वयंचलित आंतर शाखा मेळ

आम्हाला एक मिस्ड कॉल द्या

सन्माननीय अल्टीमस ग्राहक

© Copyright 2015 - All Rights Reserved | Powered by RTAC | Privacy Policy | Terms & Conditions