अल्टिमस मेरिट

  • क्रेडीट इन्फोर्मेशन सोल्युशन (सिबिल / हायमार्क)

  • ग्राहकांची परिपूर्ण पत माहिती

  • चांगल्या गुणवत्तेच्या कर्जामुळे जास्त नफा

अल्टिमस मेरिट

क्रेडीट इन्फोर्मेशन सोल्युशन

सहकारी पतसंस्था, मल्टी-स्टेट पतसंस्था आणि निधी कंपन्या त्यांच्या सभासदांना कर्ज रूपाने आर्थिक मदत करतात. तथापि, सामान्यत: त्यांना कर्जदाराच्या आधीच्या कर्ज व्यवहाराबद्दल सखोल माहिती नसते. क्रेडिट माहितीच्या कमतरतेमुळे थकीत कर्जामध्ये वाढ होते आणि परिणामतः संस्थेची नफा क्षमता कमी होते.

अल्टिमस मेरिट सोल्युशन कर्ज घेणा-यांची विश्वसनीय पत माहिती उपलब्ध करून देते.

महत्वाची वैशिष्टे

  • ऑनलाइन सिस्टिम.
  • नावाजलेले क्रेडिट ब्युरो - ट्रान्सयुनियन सिबिल आणि सीआरआयएफ हायमार्क’
  • बँका, फायनान्स कंपन्या, सहकारी पतसंस्था व इतर वित्तीय संस्थांकडील कर्जदाराच्या कर्जाची माहिती मिळते

सामान्य प्रश्नोत्तरे

अल्टिमस मेरिट हे क्लाऊड वर आधारित पत माहिती रिपोर्टिंग सोल्युशन आहे जे ऑनलाइन पद्धतीने संभाव्य कर्जदारांचा पत इतिहास दर्शविते. हे सहकारी पतसंस्था, बहु-राज्य सहकारी पत संस्था आणि निधी कंपन्यांना त्यांच्या ज्या सभासंदाचा कर्ज इतिहास चांगला आहे अशांनाच कर्ज वाटप करण्यास आणि पर्यायाने भविष्यातील NPA कमी करण्यास मदत करते.
अल्टिमस मेरिट क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये विद्यमान किंवा संभाव्य कर्जदाराच्या ऐतिहासिक कर्ज माहितीचा समावेश आहे. यात कर्जदाराने घेतलेली चालू आणि मागील कर्जे, कर्जदाराने भरलेल्या प्रत्येक हप्त्याचा तपशील आणि थकीत हप्त्यांची माहिती तसेच कर्जदाराने घेतलेल्या कर्जासंबंधी कायदेशीर खटले / write-off इत्यादी माहिती समाविष्ट केली जाते. सर्व उपलब्ध कर्ज इतिहासावर आधारित, ही प्रणाली 300 ते 900 गुण श्रेणीमधील क्रेडिट स्कोअर देखील प्रदर्शित करते. या व्यतिरिक्त, अहवालात कर्जदाराने विविध वित्तीय संस्थांकडे अलीकडील काळात केलेल्या कर्ज चौकशीचा समावेश आहे.
भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ट्रान्सयुनियन सिबिल आणि सीआरआयएफ हायमार्क सारख्या नामांकित कंपन्यांना क्रेडिट ब्युरो म्हणून काम करण्यास मान्यता दिली आहे. हे ब्युरो बँका, फायनान्स कंपन्या इत्यादी वित्तीय संस्थांनी दिलेल्या कर्जांची माहिती संकलित करून त्यावर आधारित पत माहिती प्रदान करतात. ही पत माहिती कर्ज घेणार्याच्या पॅन / आधार सारख्या ओळखपत्र क्रमांकावर आधारित असते.
अल्टिमस मेरिट सहभागी सहकारी पतसंस्थांकडील कर्ज आणि 101 प्रकरणांची माहिती प्रदान करते.

आम्हाला एक मिस्ड कॉल द्या

सन्माननीय अल्टीमस ग्राहक

© Copyright 2015 - All Rights Reserved | Powered by RTAC | Privacy Policy | Terms & Conditions