अल्टिमस BMS

  • कलेक्शन आणि पेमेंट मोबाइल अ‍ॅप

  • ग्राहकांचा विश्वास परत मिळवा

  • वाढीव पिग्मी एजंट /कर्मचारी उत्पादकता

अल्टिमस BMS - कलेक्शन आणि पेमेंट मोबाइल अ‍ॅप

सहकारी पतसंस्था, मल्टी-स्टेट पतसंस्था, निधी कंपन्या, NBFC आणि बँका यासारख्या वित्तीय संस्थांना, ठेवी किंवा कर्जाची कलेक्शन प्रक्रिया सुधारणे आणि नियंत्रित करणे महत्वाचे आहे. हे कलेक्शन मॅनुअली किंवा पारंपारिक पिग्मी मशीनद्वारे केल्यास अनिश्चित रोख भरणा, कमी दर्जाची ग्राहक सेवा अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तसेच ही प्रक्रिया योग्य रीतीने आणि वेळेवर नियंत्रित न केल्यास संस्थेच्या विश्वासार्हतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो.

अल्टिमस BMS मोबाईल अँप आपली कलेक्शन प्रक्रिया नियंत्रित करण्यास आणि सुधारणा करण्यास मदत करते.

महत्वाची वैशिष्टे

  • वापर करण्यास अतिशय सोपे असे मोबाइल अ‍ॅप
  • ग्राहकांसाठी Doorstep कलेक्शन आणि पेमेंट सेवा
  • जवळच्या बँक शाखेत रोख जमा करण्याची सोय

सतत विचारले जाणारे प्रश्न

अल्टिमस BMS हे एक एंड्रॉइड मोबाइल अ‍ॅप वर आधारित कलेक्शन (पिग्मी कलेक्शन) सोल्युशन आहे जे सहकारी पतसंस्था, बहु-राज्य सहकारी पतसंस्था, निधी कंपन्या, NBFC आणि बँकासाठी खास करून उपयुक्त आहे.
अल्टिमस BMS मोबाईलअँप द्वारे विविध खाते प्रकारांनुसार उदा. दैनंदिन ठेव खाती, बचत खाती, आवर्ती ठेव खाती आणि कर्ज हप्ते यांचे कलेक्शन करता येते.
अल्टिमस BMSमध्ये कर्ज वसुली गोळा करण्याचे वैशिष्ट्य आहे. कर्ज वसुली कर्मचारी ग्राहकांच्या भेटींचे वेळापत्रक ठरवू शकतात आणि भेटींचे तपशील ट्रॅक करू शकतात. मुख्यालयातील कर्मचारीही त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने ही माहिती पाहू शकतात.
ग्राहकांना कलेक्शन माहिती / पोच मिळण्याकरिता अल्टिमस BMS अँप मध्ये अनेक मार्ग आहेत. जेव्हा पिग्मी एजंट / कर्मचारी त्यांच्याकडून पैसे गोळा करतात तेव्हा आपल्या ग्राहकांना SMS किंवा आमच्या अ‍ॅपद्वारे नोटिफिकेशन पाठविले जाते. जर ग्राहकाला छापील पावती हवी असल्यास ब्लूटूथ प्रिंटरची सोय सुद्धा दिली आहे.
अल्टिमस BMS मोबाईल अ‍ॅप ऑनलाइन आणि ऑफलाइन अश्या दोन्ही प्रकारे कार्य करते. जर कलेक्शन चालू असताना डेटा कनेक्शन गेले तरीही आपले कलेक्शन ऑपरेशन चालू राहते. जेव्हा डेटा कनेक्शन परत येइल तेव्हा सर्व व्यवहार क्लाऊड वर अपलोड केले जातात.
अल्टिमस BMS मोबाईल अँप हे फील्ड कलेक्शन ऑपरेशनची उत्पादकता नियंत्रित करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. कलेक्शन रिपोर्ट केवळ पिग्मी एजंट / कर्मचारी आणि संबंधित शाखा व्यवस्थापकांनाच नाही तर क्षेत्रीय / मुख्य कार्यालयातील कर्मचार्यांना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केले जातात. हे अहवाल चार्ट तसेच ग्राफिकल स्वरूपात उपलब्ध आहेत. आपण पिग्मी एजंटांना / कर्मचाऱ्यांना टार्गेट सुद्धा देऊ शकतो आणि त्यांच्या वास्तविक कामगिरीचे मूल्यांकन करु शकतो. ह्यामुळे मॅन्युअल रिपोर्ट तयार करून मुख्य कार्यालयाला पाठविण्याची गरज उरत नाही.

अल्टिमस BMS कलेक्शन मोबाईल अ‍ॅप मध्ये पिग्मी एजंट / कर्मचाऱ्यांना जवळच्या बँक शाखेत कलेक्शनचे पैसे जमा करू देण्याची सोय आहे. यामुळे पिग्मी एजंट / कर्मचाऱ्यांना संस्थेच्या शाखेत जाण्या/ येण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचतो. रोजच्या रोज कलेक्शनचे पैसे उपलब्ध झाल्यामुळे संस्थेचा कॅश-फ्लो सुधारतो.

आम्हाला एक मिस्ड कॉल द्या

सन्माननीय अल्टीमस ग्राहक

ग्राहक अभिप्राय

After implementing BMS Collection App, we were able to significantly improve control on our field collection operations. Really a feature rich product!

1.jpg

Mr. Vijay More

CEO, Rameshwar co-operative Bank, Mumbai



We use BMS collection app, CIBIL Reports and eDMS solutions and our experience has been very consistent across the products - cutting edge technology, simple to use and unbelievably prompt after sales service.

1.jpg

Mr. Kailas Shetye

Chairman, MVTV Co-operative Credit Society, Mumbai

आमच्या मल्टिस्टेट च्या सर्व शाखांमध्ये आम्ही BMS अँप वापरतो. मला व्यक्तिशः आवडलेले फिचर म्हणजे यामुळे संपूर्ण संस्थेचे रोजचे कलेक्शन आम्ही मुख्य कार्यालयात बसून ऑनलाईन पाहू शकतो. भविष्यकाळात येणारी त्यांची नवीन प्रॉडक्ट्स वापरायला आम्हाला नक्कीच आवडेल.

1.jpg

श्री. मल्लिकार्जुन मुनेप्पा केंदुळे

Chairman, Shri Panchmukhi Hanuman Multi-state co-operative Credit society, Solapur

© Copyright 2015 - All Rights Reserved | Powered by RTAC | Privacy Policy | Terms & Conditions