अल्टिमस इनसाइट

  • कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (CRM) प्रणाली

  • ग्राहकांची सर्वांगीण माहिती

  • ग्राहक मिळवा - व्यावसायिक नाते जोडा - नाते टिकवा

  • व्यवसायात नवीन शिखरे पादाक्रांत करा

अल्टिमस इनसाइट

कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रणाली

आजच्या स्पर्धात्मक काळात, वित्तीय संस्थांना नवीन ग्राहक संपादन करण्याच्या आणि विद्यमान ग्राहक टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आमच्या CRM सोल्युशनचे उद्दीष्ट सहकारी पतसंस्था, मल्टी-स्टेट पतसंस्था, निधी कंपन्या, NBFC आणि बँकांना लीड्स आणि प्रॉस्पेक्ट्सचे ग्राहकांमध्ये रूपांतर करण्यास मदत करणे हे आहे. ग्राहकांची सर्वांगीण माहिती ग्राहकांचे सेवेच्या दृष्टीकोनातून योग्य वर्गीकरण करण्यात आणि फायदेशीर मार्गाने अर्थपूर्ण सेवा देण्यास मदत करतात.

अल्टिमस इनसाइटच्या फीचर्स मध्ये ग्राहक व्यवस्थापनाच्या विक्री पूर्व, विक्री आणि विक्री नंतरच्या सेवा प्रक्रिया या भागांचा अंतर्भाव आहे.

महत्वाची वैशिष्टे

  • लीड आणि संपर्क व्यवस्थापन.
  • योजना अभियान (Campaign) व्यवस्थापन.
  • टेलिकाॅलिंग.
  • विक्री नंतरची सेवा व्यवस्थापन.

सामान्य प्रश्नोत्तरे

कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रणाली ग्राहक माहितीचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. ह्यामुळे वित्तीय संस्थांना कमीत कमी खर्चात अधिकाधिक नवीन ग्राहक मिळविणे शक्य होते. CRM सिस्टिममध्ये साठविलेल्या माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेण्यास तसेच संस्थेच्या वेगवेगळ्या विभागांना ग्राहक माहितीचे आदान प्रदान करणे शक्य होते.
जर आपणास विपणन आणि विक्री (डिपॉझिट्स गोळा करणे / कर्ज देणे) संदर्भातील योग्य नियोजन व्यावसायिक रित्या करावयाचे असेल तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी CRM सिस्टिम तुम्हाला देऊ शकते. आपण आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ इच्छित असल्यास आपणास CRM सिस्टीमची गरज आहे. ग्राहकांची सर्व प्रकारची माहिती CRM सिस्टीम सहजपणे हाताळू शकते.
अल्टिमस इनसाइट प्रथम आपल्या सर्व ग्राहकांचा डेटा संकलित करते आणि त्याआधारे आपल्या ठेव अथवा कर्ज योजनेसाठी सर्वात पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास आपणास मदत करते. यामुळे संस्थेचा विपणन खर्च कमी होऊन विपणन प्रक्रियेची उत्पादकता वाढते तसेच आपल्या व्यवसाय वाढीस मदत होते.
अल्टिमस इनसाइट ग्राहकांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या सेवा विनंत्या संस्थेपर्यंत पोहोचविण्यास साहाय्य करते. जसे की फोन, वेबसाईट, मोबाईल अँप वगैरे. तसेच सर्व ग्राहक सेवा विनंत्यांचा त्यांचे निराकरण होईपर्यंत मागोवा घेते. त्यामुळे ग्राहकांच्या समाधानाची पातळी सुधारण्यास आणि निष्ठावान ग्राहक तयार करण्यास मदत करते.

आम्हाला एक मिस्ड कॉल द्या

सन्माननीय अल्टीमस ग्राहक

© Copyright 2015 - All Rights Reserved | Powered by RTAC | Privacy Policy | Terms & Conditions