eDMS सोल्युशन

  • महत्वाची कागदपत्रे आणि माहितीची सुरक्षितता

  • ऑफिसच्या जागेची बचत करा

  • कागदपत्रे आणि माहिती गोपनीयता

eDMS - दस्तऐवज व्यवस्थापन सोल्युशन

वित्तीय क्षेत्रात कार्यरत कोणतीही संस्थेला, बऱ्याच प्रकारची कागदपत्रे जसे की विविध सदस्यता फॉर्म, खाते उघडण्याचे फॉर्म, केवायसी कागदपत्रे, कायदेशीर कागदपत्रे, व्हाउचर्स, परिपत्रक इत्यादीं वारंवार हाताळावे लागतात. ही सर्व कागदपत्रे कार्यालयीन जागा तर व्यापतातच परंतु त्याव्यतिरिक्त ही कागदपत्रे फाईल करणे, हवी असतील तेंव्हा फाईल शोधून त्यातून काढणे आणि काम होताच पुन्हा फाईल करून जागेवर ठेवणे यात बरेच मनुष्यबळ आणि वेळ खर्ची पडत असतो. या शिवाय ही कागदपत्रे बऱ्याच लोकांनी हाताळल्याने त्यातील माहितीची सुरक्षितता आणि गोपनीयता सुनिश्चित करणे देखील फार अवघड जाते.

ईडीएमएस आपल्या कागदपत्रांची गोपनीयता राखते, नैसर्गीक अथवा मानवी आपत्ती पासून त्यांचे रक्षण करते, खर्च वाचवते आणि कर्मचार्यांची उत्पादकता वाढविते.

महत्वाची वैशिष्टे

  • दस्तऐवज स्कॅन करून त्यांचे डिजिटल माध्यमात रुपांतरण.
  • क्लाऊडमध्ये रुपांतरीत कागदपत्रांचा सुरक्षित संग्रह.
  • आपण काही क्लिकमध्ये दस्तऐवज ऑनलाईन शोधू आणि पाहू शकता. मूळ प्रत काढण्याची आवश्यक नाही.
  • वापरकर्त्याच्या गरजेनुसार कागदपत्रे दर्शविली जातात.

सर्वसाधारण प्रश्नोत्तरे

eDMS सोल्युशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स मॅनेजमेंट सिस्टिम. ही प्रणाली प्रत्यक्षात दस्तऐवजांची माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित करते आणि जेंव्हा गरज लागेल तेंव्हा ऑनलाईन पद्धतीने तात्काळ शोधूही शकते.
ज्या संस्था वरचेवर बरीच कागदपत्रे हाताळतात - जसे की विविध अर्ज, केवायसी कागदपत्रे, कायदेशीर कागदपत्रे, शासकीय परिपत्रके ई. आणि या प्रक्रियेत भेडसावण्याऱ्या विविध आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्याची इच्छा असणाऱ्या संस्थांनी या प्रणालीचा अवश्य विचार करावा.

आमचे eDMS सोल्युशन वापरकर्त्यांना कागदपत्रांच्या प्रती स्कॅन करून क्लाऊडमध्ये डिजिटल पद्धतीने संग्रहित करू देते. याचे खालीलप्रमाणे विविध फायदे आहेत.

  • कागदपत्र / फाईल्स साठवून ठेवण्यासाठी होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत
  • कागदपत्र शोधण्यात, पुनर्प्राप्त करण्यावर आणि परत फाईल करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत
  • ठराविक जणांनाच आपापल्या अधिकारा नुसार लॉगीन करता येत असल्यामुळे कागदपत्रांची गोपनीयता राखण्यास मदत.
  • एका कार्यालयातून दुसर्या कार्यालयात कागदपत्रे पाठविण्याचा वेळ आणि खर्च वाचतो. यामुळे शाखा, प्रादेशिक कार्यालये आणि मुख्य कार्यालय यांच्यात समन्वय साधण्यास मदत होते.
  • नैसर्गिक / मानवी आपत्तींमुळे (आग, पूर, भूकंप, चोरी इ.) माहिती नष्ट होण्याचा धोका टाळतो.
  • मूळ कागदपत्रांची हाताळणी कमी झाल्याने कागदपत्रांची झीज कमी होते.

आम्हाला एक मिस्ड कॉल द्या

सन्माननीय अल्टीमस ग्राहक

© Copyright 2015 - All Rights Reserved | Powered by RTAC | Privacy Policy | Terms & Conditions